महाराष्ट्राची भव्यता
आणि विविधतेने तुम्ही स्तिमित व्हाल. इथल्या पर्वतराजींवर जिथवर तुमची
नजर पोहोचेल, तितके तुम्ही रोमांचित व्हाल. इथले अभेद्य, महाकाय
गडकिल्ले आजही खंबीरपणे अन ताठ मानेने उभे आहेत. इथली असंख्य मंदिरे व
लेणी
शिलाखंडामधून कलापूर्णरित्या कोरली आहेत.
गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती
२६ आगस्ट १९८२ रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून झाली. संपूर्ण
गडचिरोली जिल्हा हा पूर्वी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये समाविष्ट होता व
मुख्यतः गडचिरोली, सिरोंचा ही ठिकाणे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तहसील
म्हणून कार्यरत
होती. गडचिरोली जिल्ह्याचे एकुण क्षेत्रफळ १४४१२ चौ.कि.मी.आहे
आरमोरी, गडचिरोली जिल्ह्यातील तालुका व शहर,
गडचिरोली-नागपूर महामार्गावर वैनगंगा नदीकाठी वसले आहे. हे जिल्ह्याचे
मुख्य प्रवेशद्वार असून, येथे 311 तलाव व प्रमुख नद्या आहेत. सुपीक
जमिनीत धान, मका व भाजीपाला उत्पादन घेतले जाते. रेशीम विकास
केंद्रासाठी आरमोरी प्रसिद्ध आहे.
आरमोरी विधानसभा क्षेत्र (67-अ.ज.) चार तालुक्यांचा समावेश असलेले
प्रमुख केंद्र आहे. शिक्षण व व्यापारासाठीही प्रसिद्ध आहे. तालुक्याचे
क्षेत्रफळ 42,356.47 हेक्टर असून, 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या
97,097 आहे. यात 103 गावे, 33 ग्रामपंचायती व आरमोरी नगरपरिषद क्षेत्र
समाविष्ट आहे.
वैरागड किल्ला, भंडारेश्वर हेमाडपंती देवालय व महाशिवरात्री यात्रा
प्रसिद्ध आहेत. देऊळगाव येथे लोहखनिजाचा साठा आहे.